अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)।
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- मार्च 2025 करिता विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता अमरावती विभागीय मंडळाच्या स्तरावर हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव निलीमा टाके यांनी केले आहे.ही सुविधा दि. 5 फेब्रुवारी 2025 ते लेखी परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधी दरम्यान सकाळी 8 ते सायं. 8 पर्यंत सुरू ठेवण्यात येईल. या हेल्पलाईनकरिता पुढीलप्रमाणे अधिकारी, कर्मचारी व समुपदेकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे : समुपदेशक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यांचे नाव, पद व भ्रमणध्वनी क्रमांक :चंद्रशेखर म. गुलवाडे (अमरावती जिल्ह्याकरिता) -800704240 , मनिष भडांगे समुपदेशक (अकोला व वाशिम जिल्ह्याकरिता)-9422190678, किशोर बनारस समुपदेशक (यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्याकरिता)- 9422449345, नंदकिशोर साखरकर वरिष्ठ अधिक्षक (इ. 10 वी)-9834726328 श्रीमती पोर्णिमा कन्नमवार व.अधिक्षक (इ. 12 वी.) 9673163521, एस.एम. पंचगल्ले पर्यवेक्षक (इ. 12 वी. ) -9421087996 , श्री. ए.व्ही. नागरे पर्यवेक्षक (इ. 12 वी.) 7276487140 श्री. बी. डी. मुंडे पर्यवेक्षक (इ. 10 वी.) 9158042797 श्री. मच्छींद्र खरात पर्यवेक्षक (इ. 10 वी.) 7972608812 याप्रमाणे आहेत.तसेच कार्यालयीन हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक 0721-2662647 असून विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात काही अडचणी असल्यास वरील हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांकांवर तसेच समुपदेशकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही विभागीय सचिव निलीमा टाके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी