मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ  इंडियाचा उत्कृष्ट इनोव्हेटर पुरस्कार डॉ. अनिता पाटील यांना जाहीर
अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया, कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्सेस व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसी
मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ  इंडियाचा उत्कृष्ट इनोव्हेटर पुरस्कार डॉ. अनिता पाटील यांना जाहीर कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्याहस्ते सत्कार


अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)

मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया, कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्सेस व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद - २०२५ च्या वतीने देण्यात येणारा मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचा उत्कृष्ट इनोव्हेटर पुरस्कार हा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रा.डॉ.अनिता पाटील यांना जाहीर करण्यात आल्याबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, जीवतंत्रशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रसाद वाडेगांवकर, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. सुदर्शन कोवे, इन्क्युबेशन प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर आदी यावेळी उपस्थित होते.

संशोधन क्षेत्रातील त्यांच्या अपवादात्मक योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराची निवड करताना संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या संशोधकाच्या सादरीकरण परिक्षणानंतर ही निवड करण्यात आली आहे.

प्रा. डॉ. अनिता पाटील यांनी संशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या नावे पाच पेटंट असून त्यांची तीन पुस्तके, ५९ शोध निबंध, १५ पुस्तकातील प्रकरणे, १० शोध प्रकल्प आणि १५ इतर शोध निबंध प्रकाशित आहेत. तसेच त्या एम. फिल. आणि पीएचडी च्या संशोधन मार्गदर्शक असून आजवर त्यांच्या मार्गदर्शनात १० संशोधक विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी तर ०२ संशोधक विद्यार्थ्यांनी एम. फिल पदवी संपादन केली आहे.त्यांच्या या संशोधन कार्याचा गौरव म्हणून संशोधन क्षेत्रातील मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटीचा उत्कृष्ट इनोव्हेटर पुरस्कार हा मान्यवरांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी सातारा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र - कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, जीवतंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande