म.न.पा.शाळा जेवड येथील विद्यार्थ्यांची राष्ट्रपती भवनास भेट
अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) मनपा शाळा जेवड ही शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून आपला वेगळा ठसा निर्माण करते. या शाळेमध्ये अनेक उपक्रम होत असतात असाच एक सहशालेय उपक्रम म्हणजे शैक्षणिक सहल. दरवर्षी राज्याच्या बाहेर सहल काढण्याची परंपरा राखत याही वर्षी म
म.न.पा.शाळा जेवड येथील विद्यार्थ्यांची राष्ट्रपती भवनास भेट


अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)

मनपा शाळा जेवड ही शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून आपला वेगळा ठसा निर्माण करते. या शाळेमध्ये अनेक उपक्रम होत असतात असाच एक सहशालेय उपक्रम म्हणजे शैक्षणिक सहल. दरवर्षी राज्याच्या बाहेर सहल काढण्याची परंपरा राखत याही वर्षी मनपा शाळा जेवड ची शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांकडून अतिशय अल्प शुल्क आकारून दिल्ली येथे काढण्यात आली.

दिल्ली हे भारताच्या राजधानीचे शहर असून या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वास्तू व स्थळं आहेत. त्या सर्व स्थळांना भेट देण्याचा आनंद मनपा शाळा जेवड शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला. यामध्ये अखिल भारतीय युद्ध स्मारक म्हणजेच इंडिया गेट आणि आता हल्ली ज्याचं नाव भारत माता द्वार असं केलेलं आहे या स्थळाला भेट दिली. याविषयी माहिती घेताना भारतीय सैनिकांविषयी गर्व वाटला व अभिमानाने सर्व विद्यार्थी नतमस्तक झाले. मुघल सम्राट शहाजहान यांच्या काळात निर्माण झालेल्या लाल किल्ला या ऐतिहासिक ठिकाणास विद्यार्थ्यांनी भेट दिली. लाल किल्ल्याची भव्य दिव्य वास्तु पाहून विद्यार्थी अचंभित झाले. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधी आहे. ती राजघाट म्हणून प्रसिद्ध आहे सर्व विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीच्या समाधी समोर मौन श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. या सर्व सहली दरम्यान सर्वात महत्त्वाचे आकर्षण होते ते म्हणजे राष्ट्रपती भवन! राष्ट्रपती भवनाची भव्य दिव्य इमारत पाहूनच विद्यार्थ्यांच्या मनात या वास्तू विषयी उत्सुकता निर्माण झाली. आमच्या सोबत असलेल्या गाईड यांनी राष्ट्रपती भवनाच्या सर्व दालनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली भूतपूर्व सर्व राष्ट्रपतींच्या नावाने असलेले दालने विद्यार्थ्यांना अगदी जवळून पाहता आले. हल्लीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या साठी निर्माण केलेलं भारतातील सर्व आदिवासी जनजातींच्या कलाकृतींचं हे दालन सर्व दालनांमध्ये आकर्षक आहे. विश्वविख्यात ताजमहालचा सौंदर्य हे तर वर्णनात येत आहेत या वास्तूला भेट देताना अद्वितीय असलेलं हे शिल्प डोळ्यात विद्यार्थ्यांनी डोळ्यात साठवून घेतले याशिवाय दिल्लीमध्ये कुतुब मिनार ,अक्षरधाम, लोटस टेम्पल, बिर्ला मंदिर या सर्व वास्तूंना भेट देत मथुरा व वृंदावन या ऐतिहासिक तथा अध्यात्मिक स्थळांना देखील भेट देण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.य या सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील मेट्रोचा आनंद घेतला. तसेच दिल्लीमधील मोठमोठ्या बाजारपेठांमध्ये शॉपिंगचा सुद्धा आनंद घेता आला.या सहलीमध्ये मुख्याध्यापिका सौ वंदना सावजी, श्री प्रशांत नालसे, श्री शिरीष फसाटे, श्रीमती शीला डांगे,सौ.सीमा शिरभाते, कु.किरण नालिंदे, कु.वैशाली बुटे,कु.पुष्पा कोरडे,कु.सोनाली चापके सौ.हर्षा दिवे, श्री भुषण वाघ सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande