दिगंतराच्या खासगीउपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
बंगळुरू, 15 जानेवारी (हिं.स.) : कर्नाटकच्या बंगळुरू येथील स्टार्टप कंपनी दिगंतराच्या खासगी उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय खाजगी कंपनीचा अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह आहे. दिगंतराच्या स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग (एससीओट
दिगंतराच्या खासगी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण


बंगळुरू, 15 जानेवारी (हिं.स.) : कर्नाटकच्या बंगळुरू येथील स्टार्टप कंपनी दिगंतराच्या खासगी उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय खाजगी कंपनीचा अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह आहे.

दिगंतराच्या स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग (एससीओटी) 5 सेंटीमीटर इतक्या लहान वस्तूंचा मागोवा घेण्यास सक्षम असेल. कॅलिफोर्नियातील वँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून स्पेसएक्स फाल्कन-9 रॉकेटद्वारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.हे उपग्रह अंतराळयानाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. पृथ्वीभोवतीच्या कक्षा उपग्रहांनी तसेच अवकाशातील कचऱ्याने भरलेल्या आहेत.गेल्या महिन्यात, कक्षीय मार्गात अशा ढिगाऱ्यांच्या उपस्थितीमुळे इस्रोला स्पेडएक्स मोहिमेचे प्रक्षेपण 2 मिनिटे उशिरा करावे लागले. पृथ्वीभोवती 25 हजार किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने फिरणाऱ्या अंतराळयानावर ढिगाऱ्याच्या तुकड्याची थोडीशी टक्कर देखील घातक ठरू शकते. या मोहिमेचे उद्दिष्ट अंतराळ सुरक्षा मजबूत करणे आहे. हा उपग्रह लो अर्थ ऑर्बिट (एलईओ) मधील वस्तूंचा मागोवा घेण्यास सक्षम असेल असे दिगंतरा एरोस्पेसचे संस्थापक अनिरुद्ध शर्मा यांनी सांगितले.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande