प्रशासनाविरोधात शिक्षक संघटना निलंबित मुख्याध्यापकाच्या पाठिशी राहण्याचा निर्धार
अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) मोर्शी पंचायत समितींतर्गत अडगाव येथील जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक दिनेश भागवत यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईला विरोध करण्यात येत आहे. ही कारवाई योग्य नसल्याचे सांगत जुनी पेन्शन संघटना तसेच अन्य काही शिक्षक संघटनांनी
प्रशासनाविरोधात शिक्षक संघटना निलंबित मुख्याध्यापकाच्या पाठिशी राहण्याचा निर्धार


अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)

मोर्शी पंचायत समितींतर्गत अडगाव येथील जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक दिनेश भागवत यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईला विरोध करण्यात येत आहे. ही कारवाई योग्य नसल्याचे सांगत जुनी पेन्शन संघटना तसेच अन्य काही शिक्षक संघटनांनी मुख्याध्यापकांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मुख्याध्यापकांचे निलंबन रद्द करण्याची मागणी संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. २८ डिसेंबर रोजी अडगाव येथील जिप शाळेत पोषण आहारातून काही विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती.

याप्रकरणी मुख्याध्यापकांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई एकतर्फी असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. मुख्याध्यापकांनी काळजीपूर्वक पोषणाहाराची जबाबदारी पार पडली होती, तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी फेशन योजना संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौरव काळे यांनी केला.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रज्वल घोम, रितेश जगताप, यश बहिरम, सुधीर बहादे, स्वप्निल देशमुख, भावना राउत, अॅड. प्राजक्ता राऊत, प्रिया पळस्कर, रुपाली झोड, प्रितो दिवाण यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

सायन्सकोरवर शिक्षक संघटना एकवटल्या

■ विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी निलंबित करण्यात आलेले मुख्याध्यापक दिनेश भागवत यांच्यावरील कारवाई विरोधात अनेक शिक्षक संघटनांनी आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. त्यांचे निलंबन परत घ्यावे यासाठी पुढील काळात आंदोलन केले जाणार आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची सभा जिप सायन्सकोर हायस्कूलमध्ये पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande