नाशिक, 17 जानेवारी (हिं.स.) :बीडच्या मत्साजोगप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा परमपूज्य मोरेदादा म्हणजेच
स्वामी समर्थ केंद्रात आला होता. परंतु, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा स्वामी समर्थ
केंद्रातर्फे करण्यात आला. याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलेल्या
आरोपाचे केंद्राकडून खंडण करण्यात आले आहे.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आरोप केला की, मत्साजोग
प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व विष्णूचाटे
हे नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये येऊन आश्रय
घेतला होता आणि तिथे त्यांनी काही लोकांशी संपर्कही साधला. या केंद्राचे प्रमुख
गुरुमाऊली मोरेदादा व राज्याचे गृहमंत्री यांचे संबंध असल्याचा आरोप देखील केला
होता. सर्व प्रकरणावरती दिंडोरी येथील गुरुमाऊली आश्रमाच्या वतीने यावर केंद्राच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट
केली आहे. त्यांनी तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सीआयडीचे
अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते. त्यांनी आमचे सीसीटीव्ही तपासले.
त्यानुसार वाल्मिक कराड हे 16 डिसेंबरला केंद्रात
येऊन गेले. मात्र, त्यांच्यासोबत विष्णू चाटे नव्हते अशी माहिती आम्हाला
देण्यात आली. दत्तजयंतीचा सप्ताह
आमच्याकडे होता तेव्हा ते आले होते. त्यावेळी असंख्य भाविक आमच्याकडे आले होते.
त्यामध्ये कोण आले हे आम्हाला माहिती नाही, असंख्य भाविक येत असतात
त्याची काही आम्ही नोंद ठेवत नाही. मात्र, वाल्मिक कराड एकटे आले
व निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. देसाई
यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. वाल्मिक कराड आणि आमचा संबंध नाही. कराड केवळ
दर्शनासाठी आले होते. तसेच आम्ही वाल्मीक कराडला कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट
दिलेली नाही किंवा आश्रय दिला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तृप्ती देसाई
यांच्या आरोपात एक टक्के देखील सत्य नाही. इथे मंदिरात लाखो भाविक येतात, इथ
चुकीच्या प्रवृत्तींना संरक्षण दिलं जात नाही, असंही स्पष्टीकरण
त्यांनी दिले आहे.
या
प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटे हा त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचे
सीआयडीच्या पथकला सातत्याने सांगत होता. आता या गोष्टीला अप्रत्यक्षरीत्या पुष्टी
मिळत असून वाल्मीक कराड हा एकटाच असल्याचे स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने
सांगण्यात येत असले तरीही विष्णू चाटे हा नाशिक परिसरामध्ये असल्याचे या
निमित्याने ह समोर येत आहे. पण त्या मोबाईलचे काय झाले त्याचा तपास अजून का लागला
नाही. या सर्व प्रश्नांची उत्तर अजूनही कायम आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी
सीआयडी पथक सातत्याने काम करत आहे. पण तो मोबाईल अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे
विष्णू चाटे नाशिक मध्ये होता का आणि होता तो कुठे होता स्वामी समर्थ केंद्राच्या
वतीने फक्त वाल्मीक कराडच या ठिकाणी आल्याचे सांगण्यात येत असले तरी विष्णू चाटे
नक्की कुठे होता नाशिक मध्ये मोबाईल कुठे भेटला या प्रश्नांची उत्तरे मात्र अजून
मिळालेली नाही.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI