साेलापूर विद्यापीठातील अध्यासन केंद्रातर्फे होळकरशाहीवर संशोधन
सोलापूर, 17 मार्च, (हिं.स.)। सोलापूर येथील विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने होळकर घराणे व होळकरशाहीवर संशोधन केले जाणार आहे. केंद्रातर्फे संशोधक व साहित्यिकांसाठी ग्रंथसंपदा निर्माण केली जाणार आहे. त्यात राजमाता
साेलापूर विद्यापीठातील अध्यासन केंद्रातर्फे होळकरशाहीवर संशोधन


सोलापूर, 17 मार्च, (हिं.स.)। सोलापूर येथील विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने होळकर घराणे व होळकरशाहीवर संशोधन केले जाणार आहे. केंद्रातर्फे संशोधक व साहित्यिकांसाठी ग्रंथसंपदा निर्माण केली जाणार आहे. त्यात राजमाता अहिल्यादेवी यांच्यासह सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या कार्यावरही संशोधन होणार आहे.

सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी सोलापूर-सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील होळ मुरूम येथे झाला. भरतवर्षाचे सम्राट छत्रपती शाहू महाराज यांच्या मराठा साम्राज्यातील माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे ते पहिले सुभेदार होते. छत्रपती शाहू महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती.विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीने तयार केलेल्या नियमावलीस व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्यासाठी विद्यापीठातील अधिष्ठाता इ. ज. तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. दीपक ननवरे, तानाजी देशमुख, शिवाजी वाघमोडे आणि अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. प्रभाकर कोळेकर या तज्ज्ञांची समिती नेमली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande