अमरावती : १,७६१ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात १२नोव्हेंबरपासून सुरू झालेली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ३१ डिसेंबरला आटोपली. यामध्ये एकूण १ हजार ७६१ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना वेळापत्रकाप्रमाणे २ जानेवारीला आदेश देणे क्र
जिल्ह्यात १,७६१ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या  कार्यमुक्तीचे आदेश 30 एप्रिल रोजी मिळणार


अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)।

अमरावती जिल्ह्यात १२नोव्हेंबरपासून सुरू झालेली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ३१ डिसेंबरला आटोपली. यामध्ये एकूण १ हजार ७६१ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना वेळापत्रकाप्रमाणे २ जानेवारीला आदेश देणे क्रमपात्र होते. परंतू शैक्षणिक सत्र हे ३० एप्रिल रोजी संपत असल्याने कार्यमुक्तीचे आदेश ३० एप्रिल रोजीच देण्याबाबतच्या सुचना सीईओंनी दिल्या आहेत. या शिक्षकांना १ मे रोजी बदलीच्या ठिकाणी पदस्थापना घ्यावी लागणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया न्यायप्रविष्ट असताना उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांचे एकूण १२ पिटीशन मधील ४ डिसेंबर २०२३ चे अंतीम निर्णयान्वये ऑनलाईन बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविणे व त्यांची मेळघाट क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रात बदली करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून १२ नोव्हेंबर पासून बदली प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. ३१ डिसेंबर पर्यंत सुरू असलेल्या या बदली प्रक्रियेत एकूण १,७६१ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. १७ दिवस लोटत असताना अद्यापही या शिक्षकांचे कार्यमुक्तीचे आणि पदस्थापनेचे आदेश मिळाले नव्हते. त्यामुळे विक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाल होता, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ हे दिनांक ३० एप्रिल रोजी संपुष्टात येत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरीता बदली झालेल्या शिक्षकांना ३० एप्रिल रोजी मध्यान्होत्तर कार्यमुक्त करण्यात यावे. तसेच १ मे रोजी स्थानांतरणाने पदस्थापनेच्या शाळेत रूजू होऊन तसा अहवाल सादर करावा, असे आदेश सीईओ संजिता महापात्र यांनी शुक्रवारी दिले आहे. बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी पदस्थापनेच्या शाळेत हजर न झाल्यास ते शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये सन २०२४ चे जिल्हांतर्गत बदली मधील ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यांची बदली करण्यात येऊ नये किवा बदलीस स्थगिती देण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, असे शिक्षक वगळता अन्य शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे अशी सुचना देखील देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande