सोलापूर, 18 जानेवारी (हिं.स.)।
सोलापूर महानगरपालिकेच्या थकबाकीदार मिळतदारांचे डिजिटल फलक गड्डायात्रेत ठिक ठिकाणी झळकले आहेत. होम मैदानाच्या सर्व प्रवेशव्दारा समोर, मार्कट पोलिस चौकी, सिद्धेश्वर प्रशालेसमोर असे फलक लावण्यात आले आहेत. एका डिजीटल फलकावर दहा नावे आहेत. मिळकत नंबर आणि थकबाकीची रक्कम फलकावर नमूद करण्यात आली आहे.
शहरात 2 लाख 60 हजार मिळकतदार आहेत. या मिळकतदारांकडे कोट्यवधीची थकबाकी आहे. चालू आर्थिक वर्षात करसंकलन विभागास दिलेले उदिष्ठ पुर्तीसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. मालमत्ता सिल करणे, नळ तोडणे अशी कारवाई चालू आहे. आजअखेर 140 कोटीचा टॅक्स वसुल झाला आहे. तीन महिन्यात तीनशे कोटीच्या असपास वसुलीचे आव्हान कर संकलन विभागासमोर आहे. त्यामुळे टॉप टेन थकबाकीदारांची नावे डिजीटल फलकांच्या माध्यामतून शहराच्या विविध भागात लावण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्यात शुक्रवार (दि. 17) जानेवारी रोजी ग्रामदैवत सिध्दरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेत होम मैदानावर तब्बल 25 ते 30 डिजीटल फलक झळकले आहेत. सिध्देश्वर प्रशाला येथे दोन, मार्केट पोलिस चौकी समोर दोन आणि होम मैदानाच्या प्रत्येक गेटवर प्रत्येकी तीन असे डिजीटल लावण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड