अमरावती, 2 जानेवारी (हिं.स.) सीपी स्पेशल स्कॉडचे प्रमुख पीआय आसाराम चोरले यांची पथकावर नवर्षाच्या पूर्व संध्येला गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टेक्सस स्मोकिंग शॉप या हुक्का पार्लवर धाडघातली. येथून पोलिसांनी ११ हुक्का पॉट, ८ हुक्का फ्लेव्हरचे पाकीट जप्त केले आहे. सलग सहा तासाच्या कारवाईनंतर मध्यरात्री ३.३० वाजता २०२५ सालच्या पहिला दिवशी आयुक्तालयातील प्रथम गुन्हा दाखल झाला. आशिषकडू (३८) रा, अर्जुन नगर असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, आशिष कडू यांनी पुण्यातील नामांकित टेक्सस स्मोकिंगची अमरावतीत एजन्सी घेतली. आशिषने कॅम्प भागात टेक्सस स्मोकिंग पाईन्ट सुरू केला. दुकानाच्या आतील रूममध्ये कॅबीन बनवून ग्राहकाना विविध फ्लेव्हरचा हूक्कापॉट उपलब्ध करून दिल्या जात होता. ३१ डिसेंबरला थट्रीफस्ट च्या बंदोबस्तासाठी सीपी स्पेशल स्कॉडचे प्रमुख पीआय आसाराम चोरमुले हे त्यांच्या पथकातील कॉस्टेबल ईशा खांडे, रणजीत गावंडे, मंगेश लोखंडे, आशिष भेवले, सुरजगाडगे यांच्यासह आयुक्तालयाच्या हद्दीत होते. टेक्सस हुक्का पार्लरची माहिती मिळताच स्पेशल स्कॉडने रात्री ११ वाजताच्या सुमारास तेथे धाड घातली. येथून पोलिसांनी ११ हुक्का पॉट, ८ हुक्का फ्लेव्हरचे पाकीट जप्त केले आहे. सलग सहा तासाच्या कारवाईनंतर मध्यरात्री ३.३० वाजता २०२५ सालच्या पहिला दिवशी आयुक्तालयातील प्रथम गुन्हा दाखल झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी