चंद्रपूर, 4 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर शहराच्या गौतम नगर भागातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चार अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. दुचाकीने जाताना किरकोळ अपघात झाल्यामुळे ही हत्या केल्याचे कारण पुढे आले आहे.
स्थानिक अंचलेश्वर गेट जवळील रस्त्यावर किरकोळ अपघात झाला. एका युवकाचा पाठलाग करत चौघांनी आधी त्याला धाक दाखवून नुकसान भरपाई मागितली. नुकसान भरपाई घेण्यासाठी गौतमनगर परिसरातून जात असतांना मात्र वाद वाढल्यानंतर चौघांनी मारहाण करत एकाची हत्या केली आहे. वाद वाढल्यानंतर चौघांनी त्याला लाथा बुक्क्यांनी व दगडाने दगडाने मारहाण केली व त्याचा चेहरा दगडाने ठेचून त्याला ठार केले. दरम्यान किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव