नाशिक, 4 जानेवारी (हिं.स.) नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजे रुग्णांचा खेळ करणारे रुग्णालय झाले आहे. या ठिकाणी दाखल झालेल्या रुग्णाला आपण परत सुरक्षित जाऊ का नाही याची कोणतीही शाश्वती या ठिकाणी मिळत नाही. या सर्व प्रकारावरती जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे काहीही बोलण्यास तयार नसून सर्व विषयावरती फक्त चौकशी चालू आहे असे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. मात्र यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असून आरोग्य विभाग आता या प्रकरणाकडे लक्ष देणार का असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहे.
नाशिक जिल्हा हा सातत्याने मागील दहा वर्षापर्यंत राज्याच्या राजकारणामध्ये आरोग्य विभागाचे नेतृत्व करणारा जिल्हा होता. मागच्या पाच वर्षांपूर्वी तर केंद्रातील आरोग्य मंत्रीपद देखील नाशिक जिल्ह्याने भुषविले परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा काहीही झाली तरी सुधारण्याचे नाव घेत नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे पूर्णपणे बारा वाजलेले आहेत. या ठिकाणी रुग्णाला आपण परत जिवंत जाऊ की नाही याची कोणतीही शाश्वती नाही तर करोडो रुपये बांधून तयार केलेले संदर्भ रुग्णालय देखील अतिशय घाणेरड्या स्थितीमध्ये आलेले आहेत. या ठिकाणी देखील रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. असे सर्व असताना कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही
मागील तीन दिवसांपूर्वी तर या ठिकाणी डिलिव्हरी साठी आलेल्या महिलेला सुखरूप डिलिव्हरी झाल्यानंतर अचानक पोटामध्ये दुखायला लागले आणि उपचार सुरू असताना ही महिला शुक्रवारी दुपारी मृत्यू झाली या विषयावरती कोणीही काही बोलण्यास तयार नाही
हे सर्व ताजे असतानाच पुन्हा शनिवारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बाल चोरून नेल्याचा प्रकार झाला आहे अगदी पाच दिवसांपूर्वी जन्माला आलेले बाळ चोरीला गेलेले आहे सध्या सटाणा येथे राहणारे आणि मूळचे उत्तर प्रदेश मधील राहणाऱ्या सुमन अब्दुल खान या महिलेने पाच दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला होता त्यानंतर आता या महिलेला घरी सोडणार होते पण त्यापूर्वीच नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून हे बाळ अज्ञात महिलेने चोरून नेलेले आहे याबाबतचा गुन्हा हा सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे यापूर्वी देखील असेच बाळ चोरीला गेलेले होते त्याचाही तपास अजून पर्यंत लागलेला नाही त्यानंतर ही नवीन घटना घडली आहे.
चोरीला गेल्याची घटना समजल्यानंतर तातडीने सरकार वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्यासह अन्य पोलीस या ठिकाणी दाखल झाले आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे
दरम्यान नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सक असलेले चारुदत्त शिंदे यांनी याबाबत आम्ही चौकशी करत असल्याचे सांगून वेळ मारून नेली आहे परंतु कोणतीही घटना झाल्यानंतर जिल्हा शिल्लक चिकित्सक शिंदे हे फक्त चौकशी करत आहेत असे सांगून कोणतीही कारवाई प्रत्यक्षात आजपर्यंत झालेले नाही त्यामुळे नाशिकचे जिल्हा रुग्णालय हे मृत्यूचा सापळा चोरीचे दार झाले आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI