गोंदिया, 2 जानेवारी (हिं.स.)।
गोंदिया जिल्ह्याच्या कामठा येथील तक्रारदार हे शेतमजुरी करीत असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. दरम्यान, घरकुलाच्या अनुदानाचा पहिला हप्ता 15 हजार रुपये त्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी घरकुल लाभार्थ्याकडून 10 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या कंत्राटी कनिष्ठ अभियंता व त्याच्या दोन साथीदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रमोद उपवंशी, शिपाई धनंजय तांडेकर, खाजगी ईसम विश्वनाथ तरोणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar