गोंदिया, 2 जानेवारी (हिं.स.)।
गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी हद्दीतील नागरिकांचे हरविलेले मोबाइल तांत्रिक पद्धतीने शोधून नववर्षाच्या मुहूर्तावर १२ महागडे मोबाइल मूळ मालकांना परत करण्यात आले. या मोबाइलची किंमत एक लाख २५ हजार रुपये सांगितली जाते.
रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाइल हॅण्डसेट हरविल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यास प्राप्त झाल्या होत्या. यावर रावणवाडीचे ठाणेदार वैभव पवार यांनी दखल घेऊन त्यांच्या अधिनिस्त एक टीम तयार केली व 12 मोबाईल हस्तगत केले. शेवटी नविन वर्षांत मिळालेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना देण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar