तामिळनाडू: डीएमके नेत्यावर ईडीची छापेमारी
आरबीआय नियमांच्या उल्लंघनाचे प्रकरण चेन्नई, 03 जानेवारी (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, शुक्रवारी तामिळनाडूत छापेमारी केली. डीएमके पक्षाचे सरचिटणीस दुराई मुरुगन यांच्या विरोधात या धाडी टाकण्यात आल्या आहेत. राज्यातील वेल्लोरमध्ये ईडीने
डीएमके नेत्यावर ईडीची छापेमारी


आरबीआय नियमांच्या उल्लंघनाचे प्रकरण

चेन्नई, 03 जानेवारी (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, शुक्रवारी तामिळनाडूत छापेमारी केली. डीएमके पक्षाचे सरचिटणीस दुराई मुरुगन यांच्या विरोधात या धाडी टाकण्यात आल्या आहेत. राज्यातील वेल्लोरमध्ये ईडीने एकाच वेळी 4 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले.

तामिळनाडूचे जलसंपदा मंत्री आणि इतर काही जणांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे कथित उल्लंघन आणि 500 ​​आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीशी संबंधित आहे. ईडीने जुलै 2023 मध्ये तामिळनाडू सरकारमधील वनमंत्री के पोनमुडी आणि त्यांचा मुलगा डॉ पी गौतम सिगामनी यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर त्यांची 14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. पोनमुडी 2007-2010 पर्यंत तामिळनाडू सरकारमध्ये खाण मंत्री होते असा आरोप आहे. यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा डॉ. पी. गौतम सिगामणी, सिगामनी यांचे मेहुणे के.एस. राजमहेंद्रन आणि जयचंद्रन यांच्या नावे 5 खाण परवाने जारी केले. यावेळी सिगामनी यांनी भाडेतत्त्वावरील जमिनीतून लाल मातीचे उत्खनन केले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांच्या सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर ईडीच्या कारवाईला राजकीय सूड असल्याचे म्हटले आहे. भाजप हे सर्व राजकीय सूडासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच अभिनेता विजयने तामिळनाडूमध्ये स्थापन केलेल्या पक्षाला देखील डीएमके पक्ष संपवायचा असल्याचे स्टॅलिन म्हणाले. ---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande