महाकुंभात हिंदुस्थान समाचारच्या शिबिर कार्यालयाचा शुभारंभ
देशभरात 15 भाषांमध्ये जातात वृत्तसंस्थेच्या बातम्या
प्रयागराज, 05 जानेवारी (हिं.स.) : भारतातील सर्वात जुनी वृत्तसंस्था हिंदुस्थान समाचार देशव्यापी असून याची देशभरात स्वीकारार्हता असल्याचे गौरवौद्गार गोवर्धन पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अधोक्षानंद देवतीर्थ यांनी काढले. उत्तप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेच्या कॅम्प कार्यालयाचे विधीवत भूमिपूजन आणि उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी हिंदुस्थान समाचारचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद मार्डीकर, उत्तरप्रदेशचे माहिती आयुक्त पी.एन. द्विवेदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संगाचे क्षेत्र प्रचार प्रमुख सुभाष, प्रसिद्ध गायक मनोजकुमार गुप्ता, डॉ.विवेक निगम, वृत्तसंस्थेचे राजेश तिवारी, शिव गोपाल, रितेश, डॉ.रणजीत यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते. याप्रसंगी शंकराचार्य म्हणाले की, हिंदुस्थान समाचारची उपस्थिती आणि स्वीकारार्हता, भारताच्या कानाकोपऱ्यात आणि अगदी लहान-लहान राज्यांमध्येही आहे. सर्वसामान्यांच्या भावना समजून घेऊन त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. मी अखंड भारतातील अनेक ठिकाणी या वृत्तसंस्थेची सेवा उपलब्ध असल्याचे आढळून आले. प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित कुंभमेळ्याला यामध्ये जगभरातील सनातनी लोक येणार असून विविध प्रकारचे वैदिक, सनातन आणि संत समागम होणार आहेत. हिंदुस्थान समाचार येथे सुरू होत आहे. त्यांचे पत्रकार येथील ऋषी, संत, धर्मगुरू यांचे विचार संपूर्ण जगापर्यंत पोहोचवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी हिंदुस्थान वृत्त समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद भालचंद मार्डीकर म्हणाले की, तीर्थराज असा लौकिक असलेल्या प्रयागच्या पवित्र भूमित आणि शंकराचार्यांच्या उपस्थितत झालेला सुंदर कार्यक्रम हे आमचे भाग्य आहे. आमच्या वृत्तसंस्थेची स्थापना 1948 मध्ये झाली आहे. यापूर्वी ही वृत्तसंस्था 12 भाषांमध्ये होती. परंतु, वर्तमानात आम्ही एकूण 15 भाषांमध्ये बातम्या देत आहोत. त्यांनी सांगितले की, हिंदुस्थान समाचारने मावळत्या 2024 या वर्षात 15 नोव्हेंबर रोजी मल्याळम, 12 डिसेंबर रोजी तामिळ आणि 25 डिसेंबर रोजी देववाणी संस्कृत भाषा जोडण्यात आली आहे. आता प्रयागराजच्या कॅम्प कार्यालयातून आमचे प्रतिनिधी येथून प्रत्येक क्षणाची बातमी देत राहतील. येथील बातम्या देशभर प्रसिद्ध आणि प्रसारित केल्या जातील. आमची टीम आपली जबाबदारी पूर्ण समर्पणाने पार पाडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी
राज्य माहिती आयुक्त पीएन द्विवेदी यांनी कुंभमेळ्याचे प्रयोजन, आयोजन यावर भाष्य केले. तसेच हिंदुस्थान समाचार कुंभ मेळ्याशी संबंधीत सर्व सविस्तर वृत्तांत देशभरात पोहचवेल असा विश्वास देखील व्यक्त केला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी