नवी दिल्ली, 4 जानेवारी (हिं.स.) - भारताला विविध क्षेत्रात मिळत असलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशंसा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हे यश प्रामुख्याने देशातल्या युवा पिढीच्या प्रतिभेचे आणि उर्जेचे असल्याचे नमूद केले आहे.
X या समाजमाध्यमावर MyGov मंचाने भारताच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबाबतची माहिती दिली आहे. त्याच्या प्रतिसादादाखल लिहीलेल्या संदेशात मोदी यांनी म्हटले आहे की, “भारत प्रगतीचा एक मार्ग प्रस्थापित करत आहे आणि हे आमच्या प्रतिभावान युवा पिढीमुळे शक्य झाले. आगामी काळात आम्ही यापेक्षाही अधिक चांगले यश मिळवू.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी