नाशिक रनच्या जनजागृतीसाठी सायकल रॅली
नाशिक, 4 जानेवारी (हिं.स.)।महात्मा नगर ग्राउंड येथे 'नाशिक रन 2025' जनजागृती राईड, नाशिक रन चारिटेबल ट्रस्ट व नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. दरवर्षी नाशिक रन चारिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी म्हणून ना
नाशिक रनच्या जनजागृती सायकल रॅली


नाशिक, 4 जानेवारी (हिं.स.)।महात्मा नगर ग्राउंड येथे 'नाशिक रन 2025' जनजागृती राईड, नाशिक रन चारिटेबल ट्रस्ट व नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

दरवर्षी नाशिक रन चारिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी म्हणून नाशिक रन गेल्या 22 वर्षापासून आयोजित केला जातो . या वर्षी नाशिक रन 2025 11 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे , तरी नाशिककरांनी व सर्व धावपटूंनी याची दखल घ्यावी व जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे , हे आवाहन करत आजची सायकल राईड पार पडली.

महात्मा नगर ग्राउंड येथे 200 सायकलिस्ट जमले. नासिक रन च्या टी-शर्ट चेअनावरण करण्यात आले.सर्व सायकलिस्ट साठी , नासिक रन चा फिक्कट आकाशी रंगाचा टी शर्ट परिधान करण्यासाठी देण्यात आला. सायकल व्हॅली हिरवा झेंडा दाखवण्यासाठी नासिक रन चारिटेबल ट्रस्टचे चेअरमन प्रबल रे सर , मुकुंद भट सर, खजिनदार कासार सर , ट्रस्टी रमेश शालिग्राम सर, तेजिंदर इसार , अशोक पाटील , श्रीकांत चव्हाण हे उपस्थित होते.

नाशिक रन चा मुख्य हेतू हा गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे हा असतो, आत्तापर्यंत आदिवासी पाड्यातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवली गेली , तरी या चांगल्या उपक्रमासाठी जास्तीत जास्त नाशिककरांनी पुढे यावे असे आवाहन चेअरमन प्रबल रे सरांनी केले. सायकल रॅलीच्या मार्गाबद्दल ,नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या उपाध्यक्ष डॉक्टर मनिषा रौंदळ यांनी मार्गदर्शन केले. उत्साहात सायकल रॅलीची सुरुवात झाली . महात्मा नगर ग्राउंड येथून भोसला सर्कल मार्गे कृषी नगर जॉगिंग ट्रॅक येथे रॅली पोहचली .कृषी नगर जॉगिंग ट्रॅक व अनंत कान्हेरे मैदान येथे थांबून घोषणा देऊन नाशिक रन 2025 मॅरेथॉन ची जनजागृती करण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली संपन्न झाली. गोल्फ क्लब मैदान येथे जॉगिंग ट्रॅक चे अध्यक्ष दीपक भोसले यांनी रॅलीचे स्वागत केले.

महात्मा नगर ग्राउंड येथे राईड ची समाप्ती होऊन सर्व सहभागी सायकलिस्टला रिफ्रेशमेंट देण्यात आले. या रॅलीसाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेल्या सर्व सायकलिस्टस् चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. व्यक्त करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande