नवी दिल्ली, 4 जानेवारी (हिं.स.) -
भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज - INSV तारिणीने आज (4 जानेवारी) सकाळी न्यूझीलंडच्या लिटल्टन पोर्टवरून स्थानिक वेळेनुसार 09.30 वाजता (IST नुसार 02.00 वाजता) फॉकलँड बेटांवरील पोर्ट स्टॅनले च्या दिशेने (तिसरा टप्पा) प्रस्थान केले. सुमारे 5600 सागरी मैल (सुमारे 10,400 किमी) अंतराचा हा मोहिमेतील सर्वाधिक अंतराचा टप्पा आहे. सुमारे दक्षिणेकडे 56 अंशांवरील ठिकाणाच्या दिशेने निघालेल्या तारिणीचा हा दक्षिणेकडील शेवटच्या टोकाचा मार्ग देखील असेल.
लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए – या भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या दुहेरी प्रदक्षिणेच्या ऐतिहासिक मोहिमेचा दुसरा टप्पा पूर्ण करून INSV तारिणी, 22 डिसेंबर 2024 रोजी लिटल्टन येथे दाखल झाली होती, ही मोहीम सागरी अन्वेषणाच्या भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी