संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या राजविका कोल्हेची राज्याच्या सॉफ्टबॉल संघात निवड
अहिल्यानगर, 4 जानेवारी (हिं.स.)। संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंटरनॅशनल स्कूल,शिर्डीच्या राजविका अमित कोल्हे या खेळाडूची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या १४ वर्षे वयोगटांतर्गत मुलींच्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा सॉफ्टबॉ
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या राजविका कोल्हेची राज्याच्या सॉफ्टबॉल संघात निवड


अहिल्यानगर, 4 जानेवारी (हिं.स.)।

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंटरनॅशनल स्कूल,शिर्डीच्या राजविका अमित कोल्हे या खेळाडूची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या १४ वर्षे वयोगटांतर्गत मुलींच्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा सॉफ्टबॉल स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.राजविकाला तिच्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्यामुळे महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने तिला राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान मिळाला आहेे.तिच्या या यशाबध्दल श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले व स्मिता भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,यवतमाळ यांच्या वतीने महाराष्ट्रातील आठ विभागामधुन आलेल्या १७० खेळाडूंमधुन राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या सॉफ्ट बॉल संघाच्या १६ खेळाडूंची निवड झाली.या निवड चाचणीमध्ये राजविकाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व तिला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.तिच्या निवडीचा जिल्हा,विभागीय आणि राज्य पातळी असा प्रवास झाला. संजीवनीमध्ये प्रत्येक खेळाचे राष्ट्रीय पातळीवर ट्रॅक रेकॉर्ड असणाऱ्या कोचेसची नेमणुक,भव्य मैदाने,खेळाचे संपुर्ण साहित्य आणि खेळाडूंना प्रोत्साहन,या सर्व बाबींमुळे संजीवनीचे खेळाडू विविध पातळीवर संजीवनी चा क्रीडा क्षेत्रात दबदबा निर्माण करीत आहेत.राजविकाला कोच विरूपक्ष रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.राजविका च्या या यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे,मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे,संजीवनी ग्रुप ऑफ स्कॅल्सच्या संचालिका डॉ.मनाली कोल्हे यांनी तिचे अभिनंदन करून तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande