नाशिक, 4 जानेवारी (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य रोलबॉल असोसिएशन आणि नाशिक जिल्हा रोलबॉल असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ४ आणि ५ जानेवारी २०२५ रोजी श्रद्धा लॉन्स, हनुमान वाडी रोड, पंचवटी येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेला मोठया उत्साहात सुरवात झाली.
या स्पर्धेत कोल्हापूर ,पुणे ,सातारा अहमदनगर, यवतमाळ ,अकोला नंदुरबार, नाशिक ,लातूर, जळगाव मुंबई सिटी ,ठाणे ,या जिल्ह्यामधून २१ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन राधाकृष्ण गमे माजी आयुक्त विभागीय कार्यालय नाशिक यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि श्रीफळ वाढून करण्यात आले .यावेळी आपल्या मनोगतातून खेळाडूंना त्यांनी सांगितले की, खेळाच्या माध्यमातून निर्णय घेण्याची क्षमता आत्मसात करून आपण उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपल्या जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा नावलौकिक कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.
खेळाडूंनी शिक्षणाबरोबरच खेळामध्ये चांगली मेहनत घेऊन खेळामध्ये चांगले प्राविण्य मिळविण्यासाठी मेहनत करावी असेही सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान , स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष सुरेश आण्णा पाटील यांनी भूषविले. त्यांनीही आपल्या मर्गर्दर्षणामध्ये खेळाडूंनी सतत सराव करून आपली प्रगती साधावी, यासाठी खेळातील बारीक सारीक नियमांचा अभ्यास करावा व शालेय जीवनापासून या खेळात प्राविण्य प्राप्त करावे असे सांगितले. यावेळी नाशिक व पुणे संघात सामना झाला हा सामना पुणे संघाने जिंकला.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI