नगर परिषदेने पाणीपट्टी थकवल्याने मोर्शीचाही पाणीपुरवठा बंद होणार 
अमरावती 4 जानेवारी (हिं.स.)। अमरावती जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या दमयंती सरोवरालगत असलेल्या मोर्शी शहराचा पाणीपुरवठा पाणीपट्टी न भरल्याने बंद होण्याची शक्यता आहे. न. प. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ मोर्शीकरांवर
नगर परिषदेने पाणीपट्टी थकवल्याने मोर्शीचाही पाणीपुरवठा बंद होणार 


अमरावती 4 जानेवारी (हिं.स.)।

अमरावती जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या दमयंती सरोवरालगत असलेल्या मोर्शी शहराचा पाणीपुरवठा पाणीपट्टी न भरल्याने बंद होण्याची शक्यता आहे. न. प. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ मोर्शीकरांवर येऊ शकते. न. प.च्या व्यवस्थापनशून्य नियोजनामुळे पाणीपुरवठा यंत्रणेचे वीज बिल थकले आहे. परिणामी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करून शहराचा पाणी पुरवठा ऑक्टोबर व डिसेंबर महिन्यात दोन वेळा बंद केला. या दोन्ही महिन्यात तब्बल दोन ते तीन दिवस पाणी पुरवठा बंद होता. नुकतेच २ जानेवारीला ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सावंत यांनी मोर्शी नगरपालिकेला पत्र पाठवले आहे. त्यामध्ये मोर्शी नगर परिषद पाणी पुरवठा योजनेच्या देयकापोटी ७५ लाख ४ हजार ७३६ रुपयांची व रक्कम थकीत असून ही रक्कम १० म दिवसांत न भरल्यास न.प.चा पाणी पुरवठा बंद करण्याचे नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande