बडनेरा 6 जानेवारी (हिं.स.)।
प्रादेशिक रेशीम कार्यालय बडनेरा येथील दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी मजूर नेहमीप्रमाणे काम करत असताना टसर रेशीम वन्य सिल्क अर्जुना बागेत गवत कापण्याचे काम करत असताना मजूर अजय जाधव यांना हा अजगर दिसला मजुरांनी सहाय्यक संचालक हेमंत लांडगांवकर यांना याची माहिती दिली तसेच तिथे उपस्थित असलेले नागपूर येथील रेशीम चे उपसंचालक डॉक्टर महेंद्र ढवळे हे पण उपस्थित होते यांनी वेळ न करता बडनेरा येथील ऋतिक ढोके या सर्व मित्राला फोनवर माहिती दिली व या अजगर पकडण्यास बोलवले ऋतिक डोके यांनी या अजगराला पकडून फॉरेस्ट डिपार्टमेंटला याची माहिती दिली व कोंडेश्वर जंगलातील या अजगराला सोडण्यात आले यावेळी रेशीम प्रादेशिक कार्यालय येथील सर्व कर्मचारी सुटकेचा श्वास सोडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी