राज्यातील आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, ७ जानेवारी (हिं.स.) : राज्यातील आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या आज, मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एन. नवीन सोना हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव असतील. तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नव
मंत्रालय


मुंबई, ७ जानेवारी (हिं.स.) : राज्यातील आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या आज, मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एन. नवीन सोना हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव असतील. तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नवे आयुक्त असतील.

राज्यात नवीन सरकार आल्यापासून आतापर्यंत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्याच आठवड्यातही राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. आता 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या केलेल्या अधिकार्‍यांचा तपशील

1. श्री अतुल पाटणे (IAS:RR:1999) आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई यांची सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई

2. श्रीमती ऋचा बागला (IAS:RR:1999) यांना प्रधान सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

3. श्रीमती अंशु सिन्हा (IAS:RR:1999) यांची प्रधान सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई

4. श्री एन.नवीन सोना (IAS:RR:2000) प्रधान सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), मंत्रालय, मुंबई यांचे प्रधान सचिव

5. डॉ. रामास्वामी एन. (IAS:RR:2004) सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (ADF) कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई

6. श्री वीरेंद्र सिंह (IAS:RR:2006) सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

7. श्री प्रदीप पी. (IAS:RR:2009) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई

8. श्री माणिक गुरसाल (IAS:SCS:2009) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande