अमित शहांनी लाँच केले ‘भारतपोल’ पोर्टल
नवी दिल्ली, 07 जानेवारी (हिं.स.) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज, मंगळवारी 'भारतपोल' पोर्टल लॉन्च केले. हे पोर्टल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून परदेशात गुन्हेगारांना शोधून आणण्यासाठी क
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री


नवी दिल्ली, 07 जानेवारी (हिं.स.) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज, मंगळवारी 'भारतपोल' पोर्टल लॉन्च केले. हे पोर्टल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून परदेशात गुन्हेगारांना शोधून आणण्यासाठी केलेल्या कारवाईबद्दल सर्व राज्य आणि केंद्र एजन्सींमध्ये माहितीची वास्तविक-वेळेची देवाणघेवाण सुनिश्चित करेल.

परदेशात राहणाऱ्या वॉन्टेड गुन्हेगारांना शोधण्यासाठी इंटरपोलकडून नोटीस काढावी लागते. सीबीआय भारतात इंटरपोलचे युनिट म्हणून काम करते. त्यामुळे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय एजन्सींना वॉन्टेड गुन्हेगार शोधण्यासाठी सीबीआयच्या माध्यमातून इंटरपोलशी संपर्क साधावा लागतो.केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरावरील हा समन्वय इंटरपोल संपर्क अधिकाऱ्यांमार्फत केला जातो, जे त्यांच्या संबंधित संस्थांमधील पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त आणि शाखा प्रमुखांशी संलग्न असतात. सध्या सीबीआय, आयएलओ आणि युनिट ऑफिसर्समधील संवाद प्रामुख्याने पत्रे, ईमेल आणि फॅक्सद्वारे होतो. 'भारतपोल' पोर्टल आता या अडचणींपासून दिलासा देईल आणि सर्व माहिती रिअल टाइमवर शेअर करता येईल.

------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande