वॉशिंग्टन , 5 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेतील संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदी पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या माइक जॉन्सन यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिनिधीगृहाच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत माइक जॉन्सन यांचा अवघ्या ३ मतांनी विजय झाला.रिपब्लिकन पक्षाच्या दोन सदस्यांनी त्यांच्या मतांमध्ये बदल केल्यानंतर रिपब्लिकन माईक जॉन्सन यांची अमेरिकन सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
सीएनएनच्या अहवालानुसार, जॉन्सनने २१८ मतांसह चेंबरमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि स्पीकरच्या खुर्चीवर पुन्हा निवडून येण्यासाठी पुरेसा पाठिंबा मिळवला. रिपब्लिकन पक्षाला सभागृहात २१९ जागा आहेत तर डेमोक्रॅटच्या २१५ जागा आहेत. रिपब्लिकन पक्षाला गेल्या शतकभरात इतक्या अल्प मतांचे मताधिक्य मिळाले आहे. लुईझियानाच्या चौथ्या काँग्रेशनल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ५२ वर्षीय जॉन्सन यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या हकीम जेफ्रीस यांना मिळालेल्या २१५ मतांविरुद्ध २१८ मते मिळाली.
सभापतीपदी फेरनिवड झाल्याबद्दल नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माइक जॉन्सन यांचे अभिनंदन केले आहे.ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी पोस्ट करत माइक एक उत्तम सभापती असतील आणि त्याचा फायदा आपल्या देशाला होईल, असे ते म्हणाले. निवडीनंतरच्या आपल्या भाषणात जॉन्सन यांनी ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यानंतर लगेचच त्यांनी काँग्रेसच्या सदस्यांना शपथ दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash