नाशिक, 7 जानेवारी (हिं.स.) : नाशिक विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासन सेवेतील माणिकराव गुरसाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते आपल्या पदाचा पदभार दोन दिवसांमध्ये स्वीकारणार आहेत. शासनाने हे पद पदोन्नत केलेले आहे. राज्य शासनाने आठ भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये नाशिक विकास प्राधिकरणाच्या आयुक्त पदावरती माणिकराव गुरसाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या जागेवरती मनपा आयुक्त मनीषा खत्री या होत्या. त्यांची महापालिका आयुक्तपदी मागील आठवड्यामध्ये नियुक्ती करण्यात आल्यानंतर या पदाचा पदभारही त्यांच्याकडे ठेवण्यात आलेला होता. पण मंगळवारी झालेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नाशिक विकास प्राधिकरणासाठी गुरसाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. माणिकराव गुरसाळ हे यापूर्वी नाशिक मध्ये निवासी उपजिल्हाधिकारी होते त्यानंतर ते धुळ्यातील समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी समितीमध्ये सह आयुक्त म्हणून होते त्यानंतर त्यांच्याकडे काही काळ समाज कल्याण विभागाच्या आयुक्त पदाचा ही कार्यभार देण्यात आलेला होता त्यानंतर त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पदोन्नती झाल्यानंतर बदली झाली होती.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI