चंद्रपूर, 7 जानेवारी (हिं.स.)मागील दोन महिन्यापासून
आरसीएमएस प्रणालीत बिघाड झाल्याने सदर प्रणाली संथगतीने सुरू आहे. तसेच ऑनलाईन प्रणालीतील
कामे काही दिवस पुर्णत: बंद असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटपास अडचण निर्माण
झाली आहे. मात्र ही तांत्रिक अडचण शासन स्तरावरून असून आरसीएमएस प्रणालीसंदर्भात दुरुस्तीचे
काम सुरू आहे.
आरसीएमएस प्रणाली
सुरळीत चालत नसल्यामुळे शिधापत्रिकेशी संबंधीत कामकाज करण्यास अडचण निर्माण होत आहे.
तसेच ई-केवायसी प्रमाणीकरण करण्याचे काम करता येत नाही. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी
कार्यालयाकडून पत्राद्वारे शासनास वेळोवेळी अवगत करण्यात आलेले आहे. दिनांक 1 जानेवारी
2025 पासुन प्रणालीतील कामे काही प्रमाणात संथगतीने सुरू झालेली आहे. तसेच शासनामार्फत
नवीन सर्व्हरवर माहिती घेण्याचे काम सुरूअसल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे.
त्यात दुरुस्ती करण्याबाबतची कामे शासन स्तरावर सुरू आहे. सदर कामे पूर्ण होताच यंत्रणा
पुर्ववत सुरू होईल,
असे जिल्हा पुरवठा
अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव