बेंगळुरूत ८ महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्ही व्हायरसची लागण
बेंगळुरू, 6 जानेवारी (हिं.स.)।चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. अशातच भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या व्हायरसची पहिली केस बेंगळुरूमध्ये नोंदवण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्ही विषाणूच
एचएमपीव्ही व्हायरस


बेंगळुरू, 6 जानेवारी (हिं.स.)।चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. अशातच भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या व्हायरसची पहिली केस बेंगळुरूमध्ये नोंदवण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्ही विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.या चिमुकलीची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आहे.

भारतात या व्हायरसची पहिली केस समोर येणे ही मोठी बाब आहे कारण चीनमध्ये तो वेगाने पसरत आहे आणि तेथील परिस्थिती स्फोटक असल्याचे दिसून येत आहे. बेंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीला एचपीव्हीची लागण झाली आहे, तिची लक्षणे त्याच दिशेने दर्शवत आहेत, अहवालातही व्हायरसची पुष्टी झाली आहे. ही चाचणी एका खासगी रुग्णालयाने केली होती ज्यामध्ये मुलगी HMPV विषाणू पॉझिटिव्ह आढळली. फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी 0.7 टक्के एचएमपीव्हीचे आहेत.

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एका खासगी रुग्णलयाने केलेल्या चाचणीत या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, सरकारद्वारे अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात बोलताना, खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.कर्नाटक सरकारने एचएमपीव्ही संदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या अधिक्षक डॉ. वंदना बग्गा यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.

फ्लू, खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्‍वास घ्यायला त्रास होणे, ही एचएमपीव्हीचं सामान्य लक्षणे आहेत. तसेच गंभीर स्थितीमध्ये या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार उद्‍भवण्याची शक्यता आहे. संसर्गानंतर तीन ते सहा दिवसांनी याची लक्षणे आढळून येत आहेत. या विषाणूमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने दिले आहे. हा विषाणू इतर श्वसन संसर्गजन्य विषाणूसारखाच आहे. यात सर्दी होते. यात लहान मुलांमध्ये तापासारखी लक्षणे दिसतात, मात्र योग्य काळजी घेतल्यास सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याची काहीच गरज नसल्याचे ते म्हणाले. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, HMPV हा नवीन व्हायरस नसल्याचं सांगितलं आहे. हा व्हायरस पहिल्यांदा 2001 मध्ये आढळून आला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही सेरोलॉजिकल पुराव्यांवरून असं दिसून आलं आहे की, हा व्हायरस 1958 पासून आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash


 rajesh pande