नगर : आदिवासी भिल्ल कुटुंबाची राहत्या घराची जागा नावावर करून देण्याची मागणी 
अहिल्यानगर, 6 जानेवारी (हिं.स.):- खामगाव तालुका नेवासा येथील बेघर आदिवासी भिल्ल समाजाचे ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा अनेक वर्षापासून ताब्यात असून राहत्या घराची जागा नावावर करून देण्या साठी एक लव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गो
आदिवासी भिल्ल कुटुंबाची राहात्या घराची जागा नावावर करून द्यावी


अहिल्यानगर, 6 जानेवारी (हिं.स.):- खामगाव तालुका नेवासा येथील बेघर आदिवासी भिल्ल समाजाचे ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा अनेक वर्षापासून ताब्यात असून राहत्या घराची जागा नावावर करून देण्या साठी एक लव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड,महाराष्ट्र संघटिका वैजयंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवराम माळी,अशोक माळी,विमल माळी,मांजनबाई निकम,छेबुबाई पवार,बेबई पवार,संभाजी पवार,शिवाजी पवार,नामदेव पवार,सुकेंद्र मोरे,महादेव पिंपळे आदीसह बेघर कुटुंबीय उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हंटले आहे की, खामगाव तालुका नेवासा येथील हे आदिवासी भिल्ल समाजाचे कुटुंबीय अनेक वर्षापासून राहत असून जमीन कसुन खात आहे.आदिवासी भिल्ल समाजाचे राहत्या घराची जागा नावावर करून देण्यात यावी.संपूर्ण जमीन नावावर न करता राहत्या घराची जागा नावावर करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.लवकरात लवकर राहत्या घराची जागा नावावर करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande