आ.शिवाजी कर्डिले हिंदू धर्म रक्षक पुरस्काराने सन्मानित
अहिल्यानगर, 6 जानेवारी (हिं.स.):- भिंगार येथील श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात महेश झोडगे मित्र मंडळाच्या वतीने श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हभप समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते आ.शिवाजी कर्डिले यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्कारा
आ.शिवाजी कर्डिले हिंदू धर्म रक्षक पुरस्काराने सन्मानित


अहिल्यानगर, 6 जानेवारी (हिं.स.):- भिंगार येथील श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात महेश झोडगे मित्र मंडळाच्या वतीने श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हभप समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते आ.शिवाजी कर्डिले यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी महेश झोडगे, हभप अमित धाडगे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले की,विधानसभा निवडणुकी मधील माझा विजय हा हिंदू धर्मामुळेच झाला असून दोन वर्षांपूर्वी राहुरी तालुक्यात हिंदू बांधवांवर काही जातीवादी समाजकंटकांनी अन्याय केला.त्यावेळी मी मताचे राजकारण न करता धावून गेलो आणि हिंदू धर्म वाचवण्यासाठी काम केले.राजकारणापेक्षा हिंदू धर्म टिकला पाहिजे आणि तो वाढवण्यासाठी सर्वांनी काम करावे.धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत असतात.त्या माध्यमातून धार्मिकता जोपासली जाते. राज्यातील महायुतीचे सरकार हे महाराजांच्या धार्मिकतेच्या प्रचार व प्रसारामुळे आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण हिंदू धर्म वाढीसाठी काम करीत आहे.आता माझ्यावर मोठी जबाबदारी पडली असून ती मी नक्कीच पार पाडेल असे ते म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande