गरीब नवाज यांच्या पवित्र चादरीला स्पर्श करण्याची संधी माझं भाग्य - आ. साजिद खान पठाण 
अकोला, 8 जानेवारी (हिं.स.)। भारतामध्ये बंधुभाव आणि सामाजिक सलोखा नांदतो तो फक्त सुफीसंतांच्या धर्मनिरपेक्ष कार्यामुळे, सामाजिक समष्टीच्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी मालिके हिंदुस्थान हजरत गरीब नवाज रहेमतुल्लाह अलैह यांची उत्तुंग सहिष्णूता वेल्हाळत आहे
प


अकोला, 8 जानेवारी (हिं.स.)।

भारतामध्ये बंधुभाव आणि सामाजिक सलोखा नांदतो तो फक्त सुफीसंतांच्या धर्मनिरपेक्ष कार्यामुळे, सामाजिक समष्टीच्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी मालिके हिंदुस्थान हजरत गरीब नवाज रहेमतुल्लाह अलैह यांची उत्तुंग सहिष्णूता वेल्हाळत आहे. हिंदलवली गरीब नवाज यांच्या पावन छट्टीनिमित्त 813 व्या पवित्र उर्सानिमित्त भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस तर्फे अर्पित केल्या जाणाऱ्या चादरीला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून माझा स्पर्श झाला याला मी माझं प्राक्तन, संचित महतभाग्य समजतो असे सश्रद्ध प्रतिपादन आमदार साजिद खान पठाण यांनी याप्रसंगी केले.

हजरत ख्वाजा गरीब नवाज रहेमतुल्लाह अलैह यांच्या 813 व्या पवित्र उर्सनिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची चादर आज अजमेर शरीफ राजस्थान हजरत गरीब नवाज यांच्या दरबारात पोहोचली.

यावेळी rpcc अध्यक्ष गोविंद डोटासरा, नेता प्रतिपक्ष टिकाराम जुली, खासदार इम्रान प्रतापगडी, खासदार नासेर हुसैन, अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण,आमदार रफीक खान, आमदार अमीन कागजी,माजी मंत्री शाले मोहम्मद,आमदार जाकीर हुसैन, आमदार विकास चौधरी,आमदार हाकम अली, एम डी चोपदार,,चेअरमन आबिद कागजी, धर्मेंद्र राठोड, संदीप चौधरी, नसीम अख्तर, विजय जैन,भुपेंद्र राठोड, जियाउर्रेहमान,द्रोपदी कोळी नेत्यांसह जागतिककिर्तीचे उर्दू शायर नईम फराज, राजस्थान काँग्रेस कमिटीचे

समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

चादरअर्पणाच्या या दैव दुर्लभ प्रसंगाला अनुसरून आमदार साजिद खान पठाण म्हणाले की अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या सर्वजातीधर्माच्या मंडळीने माझ्या विजयाचा रस्ता प्रशस्त केला, माझ्या माध्यमातून अकोला पश्चिमची सलामी गरीब नवाज यांच्या दरबारात पोहोचल्यामुळे मला परमोच्च आनंदाची अनुभूती झाली. गरीब नवाज आपल्या कृपाशीर्वाने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात विकासाबरोबर सामाजिक सलोख्याच्या बाजू बळकट होवो अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande