ई-पीक पाहणीला १५ जानेवारीची डेडलाइन  
अमरावती, 8 जानेवारी (हिं.स.) शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पिकाचा ऑनलाइन पेरा नोंदविणे आवश्यक आहे. मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. यावर्षी रब्बी हंगामात ५२ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक नोंद केलेली आहे. त्यानंतर
ई-पीक पाहणीला १५ जानेवारी डेडलाइन  रब्बी हंगाम : ५२ टक्के शेतकऱ्यांनी नोंदविला ऑनलाइन पेरा


अमरावती, 8 जानेवारी (हिं.स.) शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पिकाचा ऑनलाइन पेरा नोंदविणे आवश्यक आहे. मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. यावर्षी रब्बी हंगामात ५२ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक नोंद केलेली आहे. त्यानंतर सहाय्यक स्तरावर २८ फेब्रुवारीपर्यंत नोंद घेण्यात येणार आहे.रब्बी हंगामासाठी यावर्षी १ डिसेंबरपासून ई-पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे. १५ जानेवारीपर्यंत शेतकरी स्तरावर नोंद करण्यात येणार आहे. डीसीएसमध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जिओ फेन्सिंग बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच जोपर्यंत संबंधित खातेदार किंवा सहायक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करीत नाही, तोपर्यंत पिकाचे छायाचित्र काढता येणार नाही.शेतकरी स्तरावर झालेल्या ई-पीक पाहणीपैकी १० टक्के तपासणीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे व १५ जानेवारीपर्यंत १० टक्के ई-पीक पाहणी तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

शासनाच्या विविध योजनांसाठी आवश्यक

शेतकऱ्यांना विविध शासन योजनांचा लाभ घेण्यासाठी पिकाचा ऑनलाइन पेरा नोंदविणे आवश्यक आहे. पीक कर्ज, पीक विम्यासह नैसर्गिक आपत्तीसाठी अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी ई- पीक पाहणी करणे महत्त्वाचे आहे. शासनाने गतवर्षीच्या सोयाबीन व कपाशीसाठी हेक्टरी पाच हजारांचा लाभ दिला असतांना ई-पीक पाहणी केली नसलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीत नव्हती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande