विजय हजारे स्पर्धेतून केएल राहुलची माघार
मुंबई , 8 जानेवारी (हिं.स.)।विजय हजारे स्पर्धेत कर्नाटक संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी कर्नाटक संघात सहभागी करून घेतलं आहे. त्यामुळे कर्नाटक संघाची ताकद वाढणार आहे.मात्र, कर्नाटकच
केएल राहुल


मुंबई , 8 जानेवारी (हिं.स.)।विजय हजारे स्पर्धेत कर्नाटक संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी कर्नाटक संघात सहभागी करून घेतलं आहे. त्यामुळे कर्नाटक संघाची ताकद वाढणार आहे.मात्र, कर्नाटकचा स्टार खेळाडू केएल राहुलने विजय हजारे याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.

प्रसिद्ध कृष्णा आणि देवदत्त पडिक्कल देशांतर्गत स्पर्धेत खेळत आहे. हे दोन्ही खेळाडू केएल राहुलसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होते. तरीही देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी कर्नाटक संघात समावेश करण्यात आला आहे.मात्र, केएल राहुलने विजय हजारे स्पर्धेतून माघार घेतली याचे कारण आता समोर आले आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचही सामन्यात केएल राहुल खेळला आहे. त्यामुळे त्याने विश्रांती हवी असल्याचं कारण पुढे केलं आहे.या केएल राहुलच्या निर्णयाला बीसीसीआयकडून मान्यता मिळाली आहे.

केएल राहुलला विश्रांतीची गरज असल्याने आता तो बाद फेरीच्या सामन्यात कर्नाटककडून खेळणार नाही यावर मोहोर लागली आहे. केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत दिसण्याची शक्यता आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही केएल राहुलची निवड होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केएल राहुलचा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande