राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सुवर्ण पदक विजेता
जळगाव, 9 जानेवारी (हिं.स.) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या ६८ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल (१७ वर्ष
महाराष्ट्र राज्याचा संघ सुर्वण पदक


जळगाव, 9 जानेवारी (हिं.स.) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या ६८ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल (१७ वर्ष मुले व मुली) क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे संपन्न झाल्या.

या स्पर्धेतील सहभागी खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कुडचे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी बाबुलाल पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख यांनी भेट देऊन खेळाडूंची ओळख करुन घेत खेळांडूचे प्रोत्साहन वाढवले व शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघांनी सातत्याने चांगली कामगिरी करत निविर्वाद वर्चस्व राखले. मुले व मुलीच्या दोन्ही गटात महाराष्ट्र राज्याने अजिंक्यपद प्राप्त केले आहे. विजयी संघांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विजयी चषक प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी खेळाडुंना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी म्हणाले की, क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या राज्याचा व देशाचा नावलौकीक वाढवावा. राज्याचे व देशाचे प्रतिनिधीत्व करणे ही अभिमानाची गोष्ट असून या क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातुन आपल्याला वेगवेगळ्या लोकांचा संस्कृती व भाषेचा परिचय होतो. व त्यातुन आपल्या मध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते. येथील सर्व खेळाडुंचे मी अभिनंदन करतो. या स्पर्धेतुन आपण निश्चितच खुप चांगल्या आठवणी घेवून जाणार आहात. ज्या संघांना विजय मिळाला नाही अशा संघांनी येत्या काळात अधिक सराव करुन पुढील स्पर्धामध्ये विजय मिळविण्याचा प्रयत्न करावा व खेळाच्या क्षेत्रामध्ये कठोर परिश्रम करुन यशस्वी व्हावे .

या वेळी माजी महापौर सीमाताई भोळे, सिध्दी विनायक संस्था संचालिका डॉ. अमृताताई सोनवणे, ग.स. सोसायटी अध्यक्ष अजबसींग पाटील, स्पर्धा निरिक्षक पदमसिंग कौंतेय, उपाध्य भारतीय सॉफ्टबॉल संघटना डॉ. प्रदिप तळवेलकर, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटना सहसचिव गोकुळ तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, छत्रपती पुरस्कारार्थी कीशोर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडुंना पारीतोषिक देण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे खेळाडु व स्वयंम सेवक तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढिल प्रमाणे- 17 वर्ष मुले प्रथम- महाराष्ट्र द्वितीय – छत्तीसगढ तृतीय पंजाब

17 वर्ष मुली प्रथम- महाराष्ट्र, द्वितीय – दिल्ली, तृतीय तेलंगना.

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande