सोनू सूदचा 'फतेह' चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत
मुंबई , 9 जानेवारी (हिं.स.)।सोनू सूदचा आगामी 'फतेह' चित्रपट हा प्रदर्शनासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सिनेमागृहात हा सिनेमा प्रत्येकाला पाहायला जाणं परवडत नाही. यामुळेच सोनू सूदने चाहत्यांसाठी एक खास सवलत दिली आहे. हि सवलत म्हणजे 'फतेह' हा चित्रपट प्र
सोनू सूद


मुंबई , 9 जानेवारी (हिं.स.)।सोनू सूदचा आगामी 'फतेह' चित्रपट हा प्रदर्शनासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सिनेमागृहात हा सिनेमा प्रत्येकाला पाहायला जाणं परवडत नाही. यामुळेच सोनू सूदने चाहत्यांसाठी एक खास सवलत दिली आहे. हि सवलत म्हणजे 'फतेह' हा चित्रपट प्रेक्षकांना ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

'फतेह' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या तिकिटांची किंमत फक्त ९९ रुपये असेल, अशी घोषणा सोनू सूदने केली आहे. सोनू सूदने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हणलं आहे की, २०२० मध्ये, जेव्हा संपूर्ण कोविड सुरू झाला, तेव्हा हजारो आणि लाखो लोक मदतीसाठी माझ्याकडे येऊ इच्छित होते. त्यांच्यासोबत सायबर फसवणूक होऊ लागली. त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले. मला हे अजिबात आवडलं नाही. म्हणून मी विचार करत होतो की तुमच्यासाठी बनवलेला हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल आणि थिएटरमध्ये कसा प्रदर्शित होईल? १० जानेवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे. तर तुमच्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी 'फतेह'च्या तिकिटाची किंमत ९९ रुपये असेल. तसेच चित्रपटातून मिळणारा नफा हा धर्मादाय संस्थेला दान केला जाणार आहे.

हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दोन ट्रेलर रिलीज झाले असून दोन्ही ट्रेलर प्रेक्षणीय आहेत. सध्या ट्रेलर पाहता हा चित्रपट ॲक्शन आणि फायटिंगच्या बाबतीत रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’शी टक्कर देत असल्याचे दिसते आहे. तसेच या चित्रपमध्ये सोनू सूद डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. तर सोनू सूदसोबत जॅकलिन फर्नांडिस सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोनू सूद या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. तसेच या चित्रपटामध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकार काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande