अमरावती, 9 जानेवारी (हिं.स.)
प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या वतीने येत्या २४, २५,व २६ जानेवारी २०२५ रोजी तीन दिवसीय अमरावती आमदार सांस्कृतिक महोत्सव-२०२५ चे भव्य आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.
या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत भव्य पुष्पप्रदर्शनी व स्पर्धा, महिला बचत गट मेळावा-वस्तूंची प्रदर्शनी व विक्री, ग्रंथाली पुस्तक प्रदर्शनी, राज्यस्तरीय सामुहिक नृत्य स्पर्धा व स्वर-शोध मराठी-हिंदी खुली सिनेगीत गायन स्पर्धा, असे रंगारंग कार्यक्रम होणार आहे. सांस्कृतिक महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या भव्य पुष्प सजावट-प्रदर्शनी व स्पर्धा चे मुख्य यजमान अमरावती गार्डन क्लब असून पुष्पप्रेमींना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी डॉ.सुचिताताई खोडके ९८२३१६५९००, डॉ गजेंद्रसिंग पचलोरे ९४२२९५७७६३, डॉ शितल डगवार ९६३७९९३६९९,डॉ मयूर गावंडे ८२७५३९५५०६, या क्रमांकावर संपर्क करून नावनोंदणी करावी लागणार आहे. तर सिद्धी विनायक महिला बचत गट महासंघा द्वारे आयोजित महिला बचत गट मेळावामध्ये महिला बचत गटांना विविध उत्पादनांचे स्टॉल लावायचे असल्याने त्यांना श्री.सिद्धीविनायक महिला बचत गट सहकारी पतसंस्था मनपा व्यापारी संकुल राजापेठ येथे किंवा ९५९५०५६१२८ या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच राज्यस्तरीय सामुहिक नृत्य स्पर्धा करिता शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी आयएमए हॉल, कॅम्प रोड,अमरावती येथे दुपारी १ वाजता पासून निवड चाचणी (audion-आडीशन ) घेण्यात येणार आहे. त्याच बरोबर राज्यस्तरीय स्वर-शोध हिंदी -मराठी खुली सिने गीत स्पर्धा गट -अ व गट ब मध्ये सहभागी होण्याकरीता येत्या रविवार १९ जानेवारी रोजी आरसीएन डिजिटल कार्यालय तिसरा माळा मनपा व्यापारी संकुल राजापेठ,अमरावती येथे सकाळी ८ वाजता पासून निवड फेरी होणार आहे. या दोन्ही स्पर्धांच्या नावनोंदणी करिता ७२१९०५३८०५,किंवा ९१७५०२३२२५ या क्रमांकावर संपर्क करावा लागणार आहे. राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा व स्वरशोध मराठी -हिंदी सिनेगीत गायन स्पर्धेकरीता संपूर्ण राज्यभरातून प्रवेशिका मागविण्यात आल्या असून प्रवेश निःशुल्क राहणार आहे. त्यामुळे बाहेर गावातील कलावंतांना निवड फेरी मध्ये गुगल फार्म भरून सहभागी होता येईल , करिता समुह नृत्यस्पर्धेसाठी https://forms.gle/CT3v1CoASWhEvgVN6 व स्वर शोध गीत गायन स्पर्धेसाठी https://shorturl.at/gNPsC या दिलेल्या लिंक वर ऑडिशन फॉर्म भरावे लागणार असून दिलेल्या मोबाईल व्हाट्सअप नंबरवर व्हिडीओ अपलोड करण्याचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी