श्रुती अरविंद राठी राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी पात्र
नाशिक, 8 जानेवारी (हिं.स.)। - येथील मोतीवाला कॉलेज अॅाफ फिजीओथेरेपीच्या चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी श्रुती अरविंद राठी भोपाळस्थित सॅम ग्लाेबल युनिव्हर्सिटी येथे झालेल्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी महिला बुध्दीबळ स्पर्धेत चतुर्थ पारितोषिक मिळवले.
श्रुती अरविंद राठी राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी पात्र


नाशिक, 8 जानेवारी (हिं.स.)।

- येथील मोतीवाला कॉलेज अॅाफ फिजीओथेरेपीच्या चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी श्रुती अरविंद राठी भोपाळस्थित सॅम ग्लाेबल युनिव्हर्सिटी येथे झालेल्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी महिला बुध्दीबळ स्पर्धेत चतुर्थ पारितोषिक मिळवले. सदर यशामुळे श्रुतीला नवी दिल्लीत होणाऱ्या अॅाल इंडिया झाेनल इंटर युनिव्हर्सिटी महिला बुध्दीबळ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे.

वेस्ट झोन स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील ५० विद्यापीठांतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या. श्रुती राठी हिने आरोग्य विज्ञान विद्यापीठाची प्रतिनिधी म्हणून सहभागी झाली. सदर यशाबद्दल श्रुती हिचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, मोतीवाला कॉलेज अॅाफ फिजीओथेरेपीचे प्राचार्य वैभव महाजन, संचालक फराज मोतीवाला आदींनी अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande