आसाम पोलिस गुगलमॅपमुळे पोहचले नागालँडला
सिव्हील ड्रेसमधील पोलिसांना गुंड समजून ठेवले ओलिस जोरहाट, 09 जानेवारी (हिं.स.) : एका गुन्हेगाराला ताब्यात घेण्याकरीता छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गुगल मॅपची मदत घेणे चांगलेच महागात पडले. गुगल मॅपच्या निर्देशाचे पालन करत हे पोलिस आसाम ऐवजी ना
गुगल मॅप लोगो


सिव्हील ड्रेसमधील पोलिसांना गुंड समजून ठेवले ओलिस

जोरहाट, 09 जानेवारी (हिं.स.) : एका गुन्हेगाराला ताब्यात घेण्याकरीता छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गुगल मॅपची मदत घेणे चांगलेच महागात पडले. गुगल मॅपच्या निर्देशाचे पालन करत हे पोलिस आसाम ऐवजी नागालँडला जाऊन पोहचले. याठिकाणी सिव्हील ड्रेसमधील पोलिसांना गुंड समजून स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि ओलिस बनवून ठेवल्याची घटना घडली.

यासंदर्भात आसाम पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील पोलिसांना एका वांछित अपराध्याची टीप मिळाली. या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी छापा टाकण्याची तयारी केली. त्यानुसार तत्काळ 16 जणांची टीम बनवण्यात आली. हे सर्वजण साध्या कपड्यात अत्याधुनिक शस्त्रांसह आरोपीच्या शोधात निघाले. या पथकाने छाप्यादरम्यान गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करत अनवधानाने नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यात जाऊन पोहोचले. एक चहाचे मळ्याचे क्षेत्र होते, जे गुगल मॅपवर आसाममध्ये दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ते नागालँडच्या सीमेवर होते. जीपीएसमध्ये गोंधळामुळे, गुन्हेगाराच्या शोधात टीम नागालँडच्या आत गेली. यावेळी केवळ 3 पोलिस गणवेशात होते तर उर्वरित 13 जण साध्या वेशात होते. त्यामुळे स्थानिकांचा गोंधळ उडून त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. तसेच स्थानिकांनी पोलिसांना ओलिस ठेवले. नागालँडमधील प्रतिकूल परिस्थितीची माहिती मिळताच जोरहाट पोलिसांनी तात्काळ पोलिस अधीक्षक मोकोकचुंग यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी आसाम पोलिस कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवले. तेव्हा स्थानिक लोकांच्या लक्षात आले की हे खरोखर आसाम पोलिस आहेत. त्यानंतर त्यांनी आसाम पोलिसांच्या 5 जणांना सोडून दिले. मात्र, त्यांनी 11 जणांना रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी सोडण्यात आले.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande