संभलमधील 1978 च्या दंगलीची फेरचौकशीहोणार
लखनऊ, 09 जानेवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या संभल येथे 1978 साली (46 वर्षांपूर्वी) झालेल्या दंगलीच्या फेरचौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी 7 दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्‍यात आले आहे. उत्तरप्रदेश विधानसभेच्या हि
योगी आदित्यनाथ


लखनऊ, 09 जानेवारी (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या संभल येथे 1978 साली (46 वर्षांपूर्वी) झालेल्या दंगलीच्या फेरचौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी 7 दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्‍यात आले आहे.

उत्तरप्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभल दंगलींवर विधान केले होते. यानंतर, या दिशेने कामाला वेग आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या डिसेंबरमध्ये विधानसभेत सांगितले होते की, 1947 पासून आतापर्यंत संभलमध्ये दंगलींमुळे 209 हिंदूंना आपला जीव गमवावा लागला आहे. संभल येथे 29 मार्च 1978 रोजी झालेल्या दंगलीत जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यात मोठ्या संख्येने हिंदू मारले गेले होते. भीतीमुळे, 40 कुटुंबांना त्यांची घरे सोडून पळून जावे लागले. पळून जाण्याचे साक्षीदार अजूनही आहेत. मंदिरात पूजा करण्यासाठी कोणीही उरले नव्हते. घटनेला 46 वर्षे उलटूनही अद्याप कोणालाही शिक्षा झालेली नाही. प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे 46 वर्षांपासून बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यानंतर, अधिकाऱ्यांनी संभल दंगलीची पुन्‍हा चौकशी सुरु केली आहे. संभलमध्ये 1978 साली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने लावलेली संचारबंदी तब्बल 2 महिने सुरू होती. या दंगलीत सुमारे 169 गुन्हे दाखल झाले होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande