श्रीनगर, 09 जानेवारी (हिं.स.) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) एकमेकांच्या विरोधात रिंगणात आहेत. यावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंडि आघाडीतील मित्र पक्ष एकत्र नसतील तर ही आघाडीच बरखास्त करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात उमर अब्दुल्ला म्हणाले की, निवडणुकीपूर्वी इंडि आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही हे दुर्दैवी आहे. या आघाडीचे नेतृत्त्व कोण करणार..? याचे धोरण काय असेल..? ही आघाडी पुढे वाटचाल कशी करणार..? या प्रश्नांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. आपण एकजूट राहू की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नसल्याचे अब्दुल्ला यांनी म्हंटले आहे. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर इंडि आघाडीची बैठक झाली पाहिजे. केवळ लोकसभा निवडणुकीपुरती आघाडी होती तर इंडि आघाडी आता बरखास्त करा. जर विधानसभा निवडणुकीतही इंडि आघाडी कायम राहणार असेल तर आपण एकत्र काम करावे अशी अपेक्षाही उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी