आकाशवाणी आणि दूरदर्शन निर्मित महाकुंभ गीतांचे प्रकाशन
नवी दिल्ली, ९ जानेवारी (हिं.स.) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात महाकुंभ 2025 साठी दूरदर्शन द्वारे निर्मित महाकुंभ है हे थीम साँग प्रकाशित केले. महाकुंभला सुरेल मानवंदना : भक्ती, परंपरा आणि उत्
अश्विनी वैष्णव महाकुंभ गीत


नवी दिल्ली, ९ जानेवारी (हिं.स.) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात महाकुंभ 2025 साठी दूरदर्शन द्वारे निर्मित महाकुंभ है हे थीम साँग प्रकाशित केले.

महाकुंभला सुरेल मानवंदना : भक्ती, परंपरा आणि उत्सवाचा मिलाफ

प्रख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांनी गायलेल्या या गीतामधून भक्ती, उत्सव आणि भव्य महाकुंभाचा चैतन्यमय सांस्कृतिक भाव प्रकट होतो. प्रख्यात गीतकार आलोक श्रीवास्तव यांनी लिहिलेले आणि क्षितिज तारे यांनी स्वरबद्ध केलेले, हृदयाला भिडणारे हे गाणे, महाकुंभाची व्याख्या मांडणारी श्रद्धा, परंपरा आणि उत्सव यांचा सुरेख संगम चितारते.

पारंपरिक सुरांचे आणि आधुनिक मांडणीचे सुरेल मिश्रण असलेले, ‘महाकुंभ है’, हे गाणे, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि महाकुंभ मेळ्याचे कालातीत महत्त्व, याला मनापासून दिलेली आदरांजली आहे. महाकुंभ है गीताचा अधिकृत व्हिडिओ आता दूरदर्शन आणि त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

आकाशवाणीने प्रयागराज महाकुंभसाठी समर्पित विशेष गाणे प्रकाशित केले

जय महाकुम्भ जय महाकुम्भ, पग पग जयकारा महाकुम्भ…

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रयागराज महाकुंभला समर्पित आकाशवाणीच्या विशेष रचनेचेही उद्घाटन केले.

हे सुमधुर गाणे संगीत आणि शब्दांच्या सुरेल मिलाफातून महाकुंभाचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सादर करते.

हे गाणे, प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर आयोजित महाकुंभाच्या भव्यतेला दिलेली आदरांजली आहे.

भक्तांच्या दृष्टीकोनातून, ही संगीतमय कलाकृती या जगप्रसिद्ध मेळाव्याचे सार प्रतिबिंबित करते. महाकुंभाचे आयोजन, प्रयागराजच्या भूमीसाठी अभिमानाचा क्षण असून, त्यामधून लाखो भाविकांच्या श्रद्धेचा प्रतिध्वनी उमटतो.

संतोष नहार आणि रतन प्रसन्ना यांच्या संगीताने सजलेल्या या गाण्याला रतन प्रसन्ना यांच्या भावपूर्ण गायनाने जिवंत केले आहे. अभिनय श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या या प्रेरणादायी गीतामधून परमात्म्याशी असलेले आध्यात्मिक नाते सुंदरपणे गुंफले आहे.

त्रिवेणी संगमात स्नान म्हणजे आत्म्याला नवचैतन्य देणे आहे, ज्यामुळे युगानुयुगे आध्यात्मिक परिपूर्णता मिळते, ही संकल्पना हे गीत सादर करते. आकाशवाणीची ही मधुर आदरांजली महाकुंभाची कालातीत परंपरा आणि पावित्र्याचा सन्मान करते, आणि श्रोत्यांमध्ये भक्ती आणि अभिमानाची भावना जागवते.

भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा हा भव्य उत्सव पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande