रत्नागिरी : चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा नियमित वाचन करण्याचा संकल्प
रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : आज साजऱ्या झालेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने चंद्रनगर (दापोली) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याचा संकल्प केला. भारतरत्न, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती तथा थोर अणुशास्त्रज्ञ डॉ.
चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा नियमित वाचन करण्याचा संकल्प


रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : आज साजऱ्या झालेल्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने चंद्रनगर (दापोली) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याचा संकल्प केला.

भारतरत्न, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती तथा थोर अणुशास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त चंद्रनगर येथील आदर्श मराठी शाळेत वाचन प्रेरणा दिन समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील शिक्षक बाबू घाडीगावकर, मानसी सावंत यांनी वाचन प्रेरणा दिन, तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्राबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद करणाऱ्या घोषवाक्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याचा व वाचन संस्कृती जोपासण्याचा संकल्प केला. तो पूर्ण होण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्याचा निर्धार शिक्षकांनीही केला. वाचनातूनच उद्याचा सक्षम नागरिक तयार होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी वेळापत्रक तयार करण्यात येणार असून त्याची कसोशीने अंमलबजावणी करण्याचे नियोजनही शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोज वेदक व रेखा ढमके यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande