परभणीत पत्रकार संघातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त परभणीतील वृत्तपत्र विक्रेत्यांचा बुधवारी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांची उपस्थिती होती. पत्रकार संघाकडून वृत्तपत्र
वृत्तपत्र विक्रेत्यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार


परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त परभणीतील वृत्तपत्र विक्रेत्यांचा बुधवारी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांची उपस्थिती होती. पत्रकार संघाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांची कृतज्ञता व्यक्त करत छोटेखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले.

मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके, राज्य कार्यकारीणी सदस्य राजकुमार ठोके हट्टेकर, लक्ष्मण मानोलीकर, विठ्ठलराव वडकुते, शिवशंकर सोनुने, मोईन खान, अरुण रणखांबे, राहूल वहिवाळ, श्रीकांत कुलकर्णी, संजय घनसावंत आदींची उपस्थिती होती. योवळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अंबादास वाकोडे यांच्यासह सुनिल करपे, मनोज कटकुरी, प्रदीप लांडगे, किरण क्षीरसागर यांचा पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande