सी के नायडू ट्रॉफीत पहिल्या दिवशी आठव्या जोडीने सौराष्ट्रला सावरले
नाशिक, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतीय क्रिकेट नियामकमंडळ - बीसीसीआय-च्या सी के नायडू ट्रॉफीत , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फक्लब नाशिक येथेसौराष्ट्रच्या पहिल्या डावातील ७ बाद १३२ पासून , मौर्य घोगरी आणि तीर्थराजसिंग जडेजाने ९२ धावांची भागीदारी
सी के नायडू ट्रॉफीत पहिल्या दिवशी    आठव्या जोडीने सौराष्ट्रला सावरले


नाशिक, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतीय क्रिकेट नियामकमंडळ - बीसीसीआय-च्या सी के नायडू ट्रॉफीत , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फक्लब नाशिक येथेसौराष्ट्रच्या पहिल्या डावातील ७ बाद १३२ पासून , मौर्य घोगरी आणि तीर्थराजसिंग जडेजाने ९२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यामुळे दिवस अखेरसौराष्ट्रच्या ८ बाद २२९ धावा झाल्या असूनमौर्य घोगरी ४२ वर नाबाद आहे.

१६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान २३ वर्षांखालील चार दिवसीय सामन्यातील हा पहिला दिवस. सकाळी सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रणय थापा राजवर्धन हंगर्गेकरच्या थेट फेकीने धावचित झाला- १ बाद ३३ , तर दक्ष भिंडीला शुभम मैडने त्याच्या तिसऱ्याच चेंडूवर बाद केले २ बाद ६१. मैडने अजून एक बळी घेतल्याने उपहारास ३१ षटकांत ३ बाद ९६ अशी स्थिती झाली होती. उपहारा नंतर मात्र कर्णधार रक्षित मेहतासह महाराष्ट्राने चार गडी झटपट बाद केले - ७ बाद १३२. पण त्यानंतर मात्र डावखुरा मौर्य घोगरी आणि तीर्थराजसिंग जडेजाने डाव सावरला. चहापानाससौराष्ट्रची६१ षटकांत ७ बाद १६५ अशी स्थिती होती. नंतरही मौर्य घोगरी आणि तीर्थराजसिंग जडेजा या जोडीने महाराष्ट्राच्या कोणत्याही गोलंदाजांना दाद न देतासौराष्ट्रला दोनशेपार नेत , ३७ षटके किल्ला लढवत डावातील ९२ हि सर्वोच्च भागीदारी नोंदवली. आज पहिला बळी घेणाऱ्या डावखुरा फिरकी गोलंदाज शुभम मैडनेच अखेर तीर्थराजसिंग जडेजाला कर्णधार सचिन धसच्या हाती ४५ वर झेलबाद करत डावातील आजच्या आपल्या चौथ्या बळीची नोंद केली. ९ व्या क्रमांकावर खेळत तीर्थराजसिंग जडेजाने ६ चौकारांसह ११३ चेंडूत सर्वाधिक ४५ धावा केल्या. उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी८ बाद २२९ वरून सौराष्ट्र संघ किती भर घालू शकतो ते बघू या.

महाराष्ट्रातर्फे डावखुरा फिरकी गोलंदाज शुभम मैडने सर्वाधिक ४ व मध्यमगती राजवर्धन हंगर्गेकरने २ बळी घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande