७५वी आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५ उत्साहात पडली पार
पुणे, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे शहर विभागीय क्रीडा समिती (Pune City Zonal Sports Committee - PCZSC) यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी ७५वी आंतरमहा
jsjs


पुणे, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे शहर विभागीय क्रीडा समिती (Pune City Zonal Sports Committee - PCZSC) यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी ७५वी आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५ (Athletics Meet 2025) चे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल अथलेटिक ट्रॅकवर दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले. या दोन दिवसीय स्पर्धेला खेळाडू, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेचे उद्घाटन माननीय प्रा. डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थित खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना खेळ आणि शिक्षणातील संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “ही ७५वी मैदानी स्पर्धा विद्यापीठाच्या ‘खेळाडू घडवा, राष्ट्र घडवा’ या घोषवाक्याला साजेशी ठरेल.”

उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कृष्णा भंडलकर (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य, एस.पी.पी.यू.), डॉ. ज्योती भाकरे (प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), डॉ. इक्बाल शेख (अध्यक्ष, पुणे शहर विभागीय क्रीडा समिती व प्राचार्य, पूना कॉलेज) आणि डॉ. सुदाम शेळके (प्रभारी संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, एस.पी.पी.यू.) हे मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत पुणे शहरातील विविध महाविद्यालयांमधील सुमारे ७०० महिला व पुरुष खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला. खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्तबद्धता आणि खेळभावना दाखवत उल्लेखनीय कामगिरी केली. विविध धावण्याच्या, उडी आणि फेक प्रकारांमध्ये खेळाडूंनी विक्रमी कामगिरी करून आपल्या महाविद्यालयांचा गौरव वाढविला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात पूना कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, क्रीडा विभागाचे अधिकारी, स्वयंसेवक विद्यार्थी आणि आयोजन समिती सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयीची आवड आणि संघभावना अधिक दृढ केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande