छत्रपती संभाजीनगर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
किरकोळ कारणावरून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नागद गावातील 25 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला.शुभम रणवीर सिंह राजपूत असे मृत तरुणाचे नाव आहे . याप्रकरणी सात जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निर्घृण हत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हटकल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपीने मुले गोळा करत तरुणाला धारदार शस्त्राने हल्ला करत संपवले .
याप्रकरणी सात जणांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.दोन आरोपी फरार आहेत .
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना डीपीजवळ काही तरुणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. सात जणांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी घटनेनंतर फरार आहेत
मुख्य आरोपी अमोल हा रात्री उशिरा गल्लीत येऊन एका व्यक्तीकडे थांबत असे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार शुभमने केली होती. त्याचप्रमाणे त्याने अमोलला यापूर्वीही हटकले होते.
याच गोष्टीचा राग मनात धरून अमोल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुभमला धडा शिकवायचा ठरवले. शुभम गावातील रस्त्याने जात असताना अमोल आणि इतरांनी त्याला अडवून धारदार शस्त्राने मानेवर आणि शरीरावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात शुभम कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis