नांदेड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्यातील पोलिसांनी गुन्हेगारावर कठोर कारवाई सुरू केली आहे. अनेक वर्षापासून गुन्हे करणाऱ्यांना मोठी शिक्षा सुनावली आहे त्यांच्या संदर्भातली सर्व कागदपत्रे तयार करून गुन्हेगारांना पाय बंद केले आहे.
नांदेड जिल्ह्यातीलसराईत गुन्हेगार विवेक विद्यासागर गजभारे यास MPDA अंतर्गत १ वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे
त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
पोलिसांनी सांगितले की,
गंभीर गुन्हे, दरोडे, जखमी करणे व शस्त्रांचा अवैध वापर अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सक्रिय होता.
या वर्षात MPDA अंतर्गत एकूण ३९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे
पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड पोलिसांचे उल्लेखनीय कार्य आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis