पृथ्वीराज सुकुमारनच्या ‘खलीफा’चा टीझर भेटीला
मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी 16 ऑक्टोबर 2025 रोजी आपला जन्मदिन साजरा करत चाहत्यांना खास गिफ्ट दिले. त्यांनी आपला आगामी चित्रपट ‘खलीफा’ चा टीझर प्रदर्शित केला. हा टीझर प्रदर्शित होताच इंटरनेटवर धूम माजवतोय. सुमारे 2
Khalifa


मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी 16 ऑक्टोबर 2025 रोजी आपला जन्मदिन साजरा करत चाहत्यांना खास गिफ्ट दिले. त्यांनी आपला आगामी चित्रपट ‘खलीफा’ चा टीझर प्रदर्शित केला. हा टीझर प्रदर्शित होताच इंटरनेटवर धूम माजवतोय.

सुमारे 2 मिनिटे 51 सेकंदांचा हा टीझर प्रेक्षकांना आमिर अली या पात्राद्वारे थरारक अनुभव देतो. पृथ्वीराजचा हा लूक खतरनाक, चालाक आणि तस्करीसंबंधी असलेला आहे. त्यांचा दमदार अंदाज आणि भावपूर्ण अभिनय प्रेक्षकांना रोमांचित करत आहे. काही तासांतच टीझरने 2 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत.

चित्रपटात पृथ्वीराज आणि दिग्दर्शक वैसाख जवळपास 16 वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत. दोघांनी शेवटच्या वेळी 2010 मध्ये ‘पोक्किरी राजा’ या चित्रपटात काम केले होते. यामुळे फॅन्ससाठी ही एक मोठी खुशखबर ठरली आहे.

कथा जिनु वी. अब्राहम यांनी लिहिली असून, त्यांनी ‘मास्टर्स’, ‘लंदन ब्रिज’, ‘कडुवा’ यांसारख्या चित्रपटांसाठीही कथा साकारल्या आहेत. टीझरमध्ये सस्पेंस, थ्रिल आणि रोमांच यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळणार आहे.

‘खलीफा’ 2026 मध्ये ओणमच्या सणाच्या वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते अशा चर्चा आहेत. फॅन्सना एक्शन, ड्रामा आणि थ्रिल चा परिपूर्ण अनुभव पाहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande