सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबूच्या ‘जटाधरा’ चे मोशन पोस्टर प्रदर्शित
मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांचा बहुप्रतीक्षित पौराणिक थ्रिलर चित्रपट ‘जटाधरा’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला टीझर प्रेक्षकांना थक्क करणारा ठरला होता आणि आता मेकर्सने 16
Jatadhara


मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांचा बहुप्रतीक्षित पौराणिक थ्रिलर चित्रपट ‘जटाधरा’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला टीझर प्रेक्षकांना थक्क करणारा ठरला होता आणि आता मेकर्सने 16 ऑक्टोबर 2025 रोजी चित्रपटाचा नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे. ज्याने चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.

पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हाचा रौद्र आणि दिव्य लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. तिच्या डोळ्यांतील तीव्रता आणि चेहऱ्यावरची दिव्य आभा चित्रपटाच्या रहस्यमय वातावरणाची झलक देते. तर सुधीर बाबू आपले पात्र उभारताना रुद्राक्ष माळ, माथ्यावर टिळक आणि त्रिशूल हातात धरून एक दिव्य योद्धा म्हणून दिसत आहेत.

दिग्दर्शक वेंकट कल्याण आणि अभिषेक जायसवाल यांच्या मते, ‘जटाधरा’ हा फक्त चित्रपट नाही, तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. ज्यामध्ये भारतीय पौराणिक कथा आधुनिक दृष्टिकोनातून सादर केल्या आहेत. कथेत रहस्य, शक्ती आणि भक्ती यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि बॅकग्राउंड स्कोअरवर खास लक्ष देण्यात आले आहे, जेणेकरून प्रेक्षक कथेत पूर्णपणे रंगुन जातील. सोनाक्षी आणि सुधीर यांची जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार असून, ही केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नवीन आणि आकर्षक ठरणार आहे.

रिलीज डेट: 7 नोव्हेंबर, 2025 (हिंदी आणि तेलुगू)

टीझर आणि पोस्टरने निर्माण केलेल्या उत्साहामुळे ‘जटाधरा’ दिवाळी सिजनमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande